मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था, ढाणकी
ता. उमरखेड जि. यवतमाळ ही संस्था मराठी भाषेच्या
संवर्धनासाठी यवतमाळ जिल्हयात खालील प्रमाणे विविध भाषिक उपक्रम राबवून
दिनांक १ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा’ साजरा केला आहे.
दिनांक |
उपक्रम |
१.१.२०१९ |
कथाकथन |
२.१.२०१९ |
शब्दांच्या सहवासात |
३.१.२०१९ |
मुलाखत |
४.१.२०१९ |
पत्रलेखन व चारोळी लेखन |
५.१.२०१९ |
कविता लेखन |
७.१.२०१९ |
अनुवाद लेखन |
८.१.२०१९ |
बालकवी संमेलन |
९.१.२०१९ |
आदिवासी गोंडी व कोलामी बोली भाषेची ओळख |
१०.१.२०१९ |
कथालेखन |
११.१.२०१९ |
साहित्य संमेलनात सहभाग |
१२.१.२०१९ |
साहित्य संमेलनात सहभाग |
१३.१.२०१९ |
साहित्य संमेलनात सहभाग |
१५.१.२०१९ |
बक्षिस वितरण व पंधरवडा समारोप |
कथाकथन :- दिनांक १ जानेवारी २०१९
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा संवर्धन
बहुउद्देशीय संस्थेने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पहिल्या दिवशी
दिनांक १ जानेवारी २०१९ ला आदिवासी व अति दुर्गम भागात असलेल्या जिल्हा
परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सूर्ला ता. झरी, जि. यवतमाळ येथे ‘कथाकथन’ हा
उपक्रम राबविला कथाकथन या उपक्रमात शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या सर्व
मुला - मुलींनी सहभाग घेतला.
संस्था अध्यक्ष सुरेश
पेंढरवाड यांनी प्रास्ताविकातून मुलांना पंचतंत्र, इसापनिती, रामायन,
महाभारत तसेच अलीखीत कथा आपल्या पर्यंत कथाकथनाच्या माध्यमातून कशा
पोहचल्या याबद्दल माहिती सांगितली व विध्यार्थांना कथाकथन या कौशल्याबद्दल
मार्गदरर्शन केले.
तसेच शाळेतील शिक्षक श्री राजेश मेश्राम सर व
संभाजी गुडमेवार सरांनी विध्यार्थांना छान बोधपर कथा सांगीतल्या.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व
काही सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.
शब्दांच्या सहवासात :- दिनांक २ जानेवारी २०१९
दिनांक २ जानेवारी
२०१९ जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सूर्ला ता. झरी, जि. यवतमाळ येथे
मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थे मार्फत ‘शब्दांच्या सहवासात’ हा
उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या सर्व
विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, विध्यार्थ्यांना वऱ्हाडी बोलीतील शब्द,
प्रत्यय घटीत शब्द, उपसर्ग घटीत शब्द अशा विविध प्रकारच्या शब्दांच्या
सहवासात रमविण्याचा प्रयत्न करून मराठी भाषेबद्दल आवड निर्माण करण्याचा
प्रयत्न करण्यात आला.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विध्यार्थ्यांना
माहित असणारे त्यांच्या बोली भाषेतील व प्रमाण भाषेतील शब्दांचा संग्रह
लिखित स्वरूपात या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्रीत करण्यात आला.
मुलाखत :- दिनांक ३ जानेवारी २०१९
विध्यार्थ्यांना मुलाखत हे तंत्र अवगत व्हावे म्हणून, शाळेचे मुख्याध्यापक तथा
राष्ट्रीय पुरस्कार
प्राप्त शिक्षक श्री रमेश बोबडे यांचा ‘महा जांबोरी महोत्सव’ निमित्ताने
होणारा नियोजित अमेरिका दौरा, व तिथे अमेरिकेत ‘मराठी भाषिक शिक्षक म्हणून
आपली काय भूमिका असेल’ या विषयावर त्यांची मुलाखत घेण्यात आली. तसेच
त्यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
मुलाखतकार म्हणून वर्ग ८ वी च्या विद्यार्थीनी कु.
प्रांजली काकडे व कु. रविना आत्राम यांनी कार्य केले.
तसेच श्रुत लेखनातून विध्यार्थ्यांनी ही मुलाखत
शब्दबद्ध केली.
कविता लेखन :- दिनांक ५ जानेवारी २०१९
दिनांक ५ जानेवारी
२०१९ ला ‘कविता लेखन’ हा उपक्रम राबविला. या वेळी विध्यार्थ्यांना कविता लेखना
संबंधीत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शालेय पाठ्यापुस्तकातील कविता वाचन
घेण्यात आले व विध्यार्थ्यांना ठराविक विषयावर ‘कविता लेखन’ करून आणण्यास
सांगितले. विध्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर सुंदर कविता लिहून आणल्या व
स्वलीखीत कवितांचा संग्रह करण्यात आला.
अशा प्रकारे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘कविता
लेखन’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे फलीत म्हणजे ९२ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनात शिक्षण विभाग यवतमाळच्या वतिने प्रकाशित ‘माळावरची
फुले’ या बालकविता संग्रहात सूर्ला शाळेतील कु. रविना आत्राम व कु. साक्षी
गेडाम या दोन विध्यार्थीनींच्या कविता प्रकाशीत झाल्या.
अनुवाद लेखन :- दिनांक ७ जानेवारी २०१९
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरोडा ता.
आर्णि जिल्हा यवतमाळ व जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सूर्ला
ता. झरी जिल्हा यवतमाळ येथे दिनांक ७ जानेवारीला ‘अनुवाद लेखन’ हा उपक्रम राबविला.
आदिवासी गोंडी व कोलामी बोली भाषेची ओळख :- दिनांक ९ जानेवारी २०१९
आदिवासी व अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद
वरिष्ठ प्राथमिक शाळा सूर्ला येथील ७०% विद्यार्थी आदिवासी गोंड व कोलाम,
परधान जातीतील असून ३०% विद्यार्थी हे इतर जातीतील आहेत. इयत्ता पहिली व
दुसरीतील विध्यार्थ्यांना शाळेत भेडसावणाऱ्या भाषिक समस्या, शिक्षकांना
भाषेच्या दृष्टीकोणातून येणारी अडचण लक्षात घेवून मराठी भाषा संवर्धन
बहुउद्देशीय संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात दिनांक ९ जानेवारीला
‘आदिवासी गोंडी व कोलामी भाषेची ओळख’ हा उपक्रम राबविला.
या उपक्रमात आदिवासी गोंडी, कोलामी व मराठी या
तीन भाषेचा तुलनात्मक अभ्यास करून विध्यार्थ्यांना गोंडी, कोलामी व मराठी
भाषेची ओळख करून देण्यात आली.
या उपक्रमामध्ये गोंडी गीत, कोलामी गीत, मराठी
गीत/कविता यांच गायन तसेच दैनंदिन जिवनात रोजच्या उपयोगात येणारे छोटी,
छोटी वाक्य, वर्गात, शाळेत संवाद साधतांना वापरली जाणारी वाक्ये, महत्वाचे
शब्द यांची ओळख विध्यार्थ्यांना करून देण्यात आली. व त्यांचा संग्रह
करण्यात आला.
शाळेतील शिक्षक राजेश मेश्राम यांनी गोंडी व
कोलामी भाषेची ओळख विध्यार्थ्यांना करून दिली तर शिक्षक तथा संस्थाध्यक्ष
सुरेश पेंढरवाड यांनी मराठीत माहिती सांगितली या उपक्रमात शाळेतील ८४
विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून गोंडी गीते, कोलामी गीते व मराठी गीतांचे
सादरीकरण केले.
बक्षीस वितरण व पंधरवडा समारोप :- दिनांक १५ जानेवारी २०१९
दिनांक १ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ या
कालावधीत मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थे कडून साजरा करण्यात आलेला
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ चा समारोपीय कार्यक्रम व बक्षीस वितरणाचा
कार्यक्रम दिनांक १५ जानेवारी २०१९ ला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा
सूर्ला ता. झरी जि. यवतमाळ येथे साजरा करण्यात आला.
या समारोपीय कार्यक्रमाला १५ दिवस संस्थे मार्फत
राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेवून मराठी भाषेची जतन व संवर्धन
करण्याची गरज, मराठी भाषेचे महत्व, जागतिक स्तरावर मराठी भाषा, स्पर्धा
परिक्षेत मराठी भाषिक विध्यार्थ्यांचा वाढणारा टक्का इत्यादी विषयावर मराठी
भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शाळेचे शिक्षक सुरेश पेंढरवाड
यांनी आपल्या मनोगतातून माहिती सांगितली. तसेच ‘मराठी भाषा संवर्धन
पंधरवडा’ मध्ये राबविलेल्या प्रत्येक दिवसाच्या उपक्रमात सहभागी विद्यार्थी
व त्या-त्या उपक्रमात चांगली कामगीरी करणारे विद्यार्थी तसेच मुलाखतीत
सहभागी विद्यार्थी, बालकवी संमेलनात सहभागी विद्यार्थी यांचा मराठी भाषा
संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करून विध्यार्थ्यांना
‘रजिस्टर, पेन’ इत्यादी लेखन साहित्य व डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे
मराठीतील पुस्तक भेट व बक्षीस म्हणून देण्यात आले.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ चा समारोपीय
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रभान मेश्राम, शाळेचे
मुख्याध्यापक रमेश बोबडे, शिक्षक राजेश मेश्राम, शिक्षक संभाजी गुडमेवार,
शिक्षक तथा संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड उपस्थित होते.
अशा प्रकारे मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी
‘मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्थे कडून १५ दिवस विविध भाषिक उपक्रम
राबवून ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला.